शिवाजीनगर नांदेड येथील ताज पाटील हाॅटेल जवळ दि २३ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास यातील आरोपी अमन चंद्रकांत लोकडे याने यातील फिर्यादी हे ताज पाटील हाॅटेलवर असताना त्यांना जबरदस्ती बुलेटवर बसवून हस्सापुर गावाजवळील मोकळ्या जागेत घेऊन जाऊन माझ्या मंगेतरचा फोटो स्टेट्सला का ठेवला असे म्हणून लाकडाने पायावर,हातावर, मारहाण करून गंभीर दुखापत केली. याप्रकरणी फिर्यादी संदिप सरोदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज दुपारी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असुन पुढील तपास सुरू आहे.