जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून रविवारी सकाळी अकरा वाजता जागतिक पर्यटन स्थळ म्हणून नावलौकिक असलेल्या सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध कास पुष्प पठार येथे ई-वेहिकल सफारीचा अर्थात प्रदूषणमुक्त सफारीचा शुभारंभ करण्यात आला. राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह आणि त्यांच्या पत्नी श्रीमती. अर्चना प्रताप सिंह यांच्या हस्ते या सफारीचे उद्घाटन झाले. सातारा जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची प्रमुख उपस्थिती होती.