एसटी बसने चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करताना ट्रकला पाठीमागून धडकल्याने भीषण अपघात घडला. हा अपघात बुधवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडला. बस मधील जखमी प्रवाशाना सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयासह दोन वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी हजर होऊन जखमीना रुग्णालयात हलवले. अधिक तपास तालुका पोलीस करीत आहेत.