वाघोली येथील केसनंद रोडवरील कोणार्क ओर्चीड सोसायटी ते निसर्ग हॉटेल या 500 मिटर अंतरात मोठया प्रमाणावर खड्डे पडले आहेत, काही दिवसापूर्वी येथे अपघातात एका नागरिकांचा मृत्यू झाला होता. एक विद्यार्थी पडून त्याच्या पायाला आणि हाताला दुखापत झाली तर त्याचा मोबाईल देखील फुटाला आहे. नागरिकांची मोठया प्रमाणावर गैरसोय होत आहे. यामुळे या भागातील नागरील त्रस्त आहेत व यासाठी त्यांनी आंदोलन केले.