इचलकरंजी शहरातील लालनगर व वेताळ पेठ परिसरात चार नशेत धुंद युवकांनी मंगळवार दि 9 सप्टेंबर रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास वाहनांची तोडफोड करत परिसरात दहशत माजवली.या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून,गावभाग पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार,रोहित कांबळे,अभिषेक बनसोडे व त्यांच्या इतर तीन साथीदारांनी वेताळ पेठेतील गल्ली क्र.३ मध्ये तीन ते चार दुचाकी तोडल्या.त्यानंतर हे चौघे लालनगर परिसरात जाऊन तेथील एका रिक्षा व सायकलची मोडतोड केली.