काँग्रेसच्या वतीने आज दिनांक 4 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास वर्ध्यात भव्य स्वाक्षरी मोहीम आणि बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. या आंदोलनाची सुरुवात आर्वी नाका येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या स्मारकाला हार अर्पण करून करण्यात आली.या प्रसंगी एक असामान्य पण प्रेरणादायक प्रसंग घडला – काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक व प्रदेश कार्यकारी मंडळाचे सदस्य शैलेश अग्रवाल यांनी हार अर्पण करण्यासाठी स्मारकाची उंची अधिक असल्याने एका स्थानिक कार्यकर्त्याला खांद्यावर उचलले, आणि त्याच्या माध