एका २८ वर्षीय महिलेला अत्यावस्थ अवस्थेत जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर प्रकृती जास्तच खालावल्याने त्यांना एका खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतांना सदर महिलेचा मृत्यू झाला. दरम्यान माहेरहून दहा लाख रूपये घेऊन ये अशी मागणी करत सासरच्या लोकांनीच विष पाजून मुलीला मारल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या संदर्भात दुपारी उशिरापर्यंत नातेवाईकांनी जिल्हा रूग्णालयात गर्दी केली होती.