पाटण तालुक्यातील मल्हारपेठ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दागिने चोरी आणि मोबाईल चोरीचा छडा लावून ते परत मुळ मालकांना परत केल्याची माहिती मल्हार पेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मच्छले यांनी शनिवारी दुपारी १ वाजता दिली. ३ लाख ३५ हजार रुपयांचे १०.२५ तोळे सोने आणि १ लाख ७० हजार रुपयांचे १० मोबाईल मुळ मालकांना परत केले.