सेवा सहकारी सोसायटी मर्यादित कालवाडी ता.आकोट या संस्थेच्या उपाध्यक्षपदी सहकार परिवाराचे निष्ठावंत माधवराव पांडे धनकवाडी यांची अविरोध निवड झाली आहे.या निवडीचे भागधारकांनी स्वागत केले आहे संस्थेच्या उपाध्यक्ष पदाच्या रिक्त जागेसाठी नुकतीच निवडणूक संस्थेच्या सभागृहात पार पडली.या निवडणूकीत सहकार गटाचे निष्ठावंत माधवराव पांडे यांची एकमताने निवड करण्यात आली.त्यांचा जेष्ठ सदस्य दयाराम पाटील व सोसायटीचे अध्यक्ष डींगाबर पाटील यांचे हस्ते सत्कार करण्यात आला