शिर्डी येथील श्री साईबाबांच्या चरणी भक्तीभावाने एका भाविकाने तब्बल १ कोटी ५८ लाख ५० हजार रुपयांचे सुवर्णदान अर्पण केले आहे. हे दान "ॐ साई राम" अशी अक्षरे कोरलेल्या सोन्याच्या स्वरूपात श्री साईबाबा संस्थानच्या तिजोरीत जमा करण्यात आले आहे.या भाविकाने आपले नाव गुप्त ठेवण्याची इच्छा व्यक्त केली असून, दान करताना कोणताही गाजावाजा न करता हे मौल्यवान सुवर्ण श्रीसाईंच्या चरणी अर्पण करण्यात आले. आज ४ सप्टेंबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी ही माहिती दिली आहे.