लातूर -लातूर शहरातील भाजीपाला व फळ विक्रेत्यांना त्यांच्या हक्काची जागा तात्काळ उपलब्ध करून द्यावी, अशी ठाम मागणी भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने ज्योतीराम चिवडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक 11 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता लातूर महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.