येत्या १४ सप्टेंबर रोजी स्वर्गीय दि. बा. पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भव्य फोर रॅली आयोजित केली असल्याची माहिती खासदार सुरेश म्हात्रे यांनी आज दिनांक ९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ च्या सुमारास दिली आहे. ही रॅली भिवंडी वरून ठाणे–नवी मुंबई मार्गे विमानतळाचा फेरा मारून जासई गावात पोहोचणार आहे. या रॅलीच्या माध्यमातून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणी केली जाणार आहे.