तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करण्यात आलेले तहसील कार्यालय हे नागरिकांसाठी ‘त्रासदायक’ ठरत असल्याचे चित्र समोर येत आहे. गोधणी रोडवरील डीएड कॉलेजच्या वसतिगृहात तहसील कार्यालय हलवण्यात आले असले तरी, तिकडे जाणारा कच्चा रस्ता अतिवृष्टीमुळे चिखलमय व खड्डेमय झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. दुचाकी, चारचाकी वाहनांसह पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असून या रस्त्यावर अनेक अपघात झाल्याचे निदर्शनास आले आहे.