दिनांक 8 सप्टेंबर रोजी सकाळी 9 च्या दरम्यान स्वताचे शेतात दुधगाव ता. किनवट जि. नांदेड येथे यातील मयत गजानन पांडुरंग किरवले, वय 42 वर्षे, रा. दुधगाव प्रधानसांगवी ता. किनवट जि. नांदेड, हा शेतात फवारणी करण्यासाठी गेला असता फवारणी करतांना इलेट्रीक विद्युत शॉक लागुन मरण पावला. खबर देणार लक्ष्मण पांडुरंग किरवले, वय 40 वर्षे, व्यवसाय शेती रा. दुधगाव यांनी दिलेल्या खबरीवरुन किनवट पोलीस स्टेशन मध्ये आकस्मित गुन्हा दाखल असुन तपास सपोउपनि कल्लाळे, हे करीत आहेत