धारणी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हिरा बंबई शेतशिवारात शेताची रखवाली करणाऱ्या मुलाला लाकडी काठीने पाठीवर मारून जखमी केले असल्याची घटना 29 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता घडली आहे. याबाबतीत जखमी झालेल्या मुलाचे वडील जगदीश सद्दू तडोकार यांनी 29 ऑगस्टला दुपारी चार वाजून 31 मिनिटांनी धारणी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. यातील फिर्यादीचा मुलगा हा शेतातील पिकावर आलेले मिठू हाकलण्याकरिता गेला असता मोहन येरांग झामरे व कैलास येरांग झामरे यांनी फिर्यादी इसमाच्या मुलाला शिवीगाळ करून लाकडी....