वाशीम जिल्ह्यातील आदर्श ग्राम ढोरखेडा येथे महिलांच्या पुढाकाराने साजरा झाला पोळा कृषी संस्कृतीतील महत्वाचा सण म्हणून ओळखला जाणारा पोळा सण आज राज्यभर हर्षोल्हासात साजरा होत आहे. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलजोडींच्या कष्टांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून व सजवलेल्या बैलांना मानाच्या तोरणाखाली नेऊन त्यांचा सन्मान केला जातो. सामान्यतः पोळ्याच्या निमित्ताने पुरुषच बैलजोडीना मानाच्या तोरणाखाली नेतात, मात्र वाशीम जिल्ह्यातील