नेहमी ऐकायला मिळतं की बाजारात नकली पनीर मिळतं, पण आता तर नकली दहीही विकलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) पथकाने आज पहाटे केलेल्या कारवाईत याचा पर्दाफाश झाला. गुप्त माहिती मिळाल्यानंतर FDA चं पथक 10 सप्टेंबरला पहाटे सहा वाजता दही बाजारात पोहोचलं. सकाळी साडेआठच्या सुमारास एक मालवाहू वाहन बाजारात आले . पथकाने ती लगेच ताब्यात घेतली. तपासणी केली असता, हे वाहन जबलपूरच्या राजकुमार गुलशन केसरवानी डेअरीची असल्याचं उघड झालं