भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी आज दिनांक ३० सप्टेंबर रोजी दुपारी १२:३० वा. दरम्यान भंडारा जिल्ह्यातील पालकमंत्री जनता दरबार या महत्त्वपूर्ण उपक्रमासंदर्भात व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (VC) द्वारे सविस्तर आढावा बैठक घेतली. या बैठकीला जिल्ह्यातील संबंधित अधिकारी, विविध विभागांचे प्रमुख तसेच स्थानिक प्रशासनाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनतेच्या अडचणी आणि मागण्या थेट तालुका स्तरावर सोडवण्यासाठी दर आठवड्याच्या सोमवारी नियमितपणे सुरू असलेल्या या 'पालकमंत्री जनता...