गणेश विसर्जन मिरवणुकी त कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कोल्हापूर सातारा सांगली पुणे ग्रामीण आणि सोलापूर ग्रामीण या पाच जिल्ह्यांमध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात केला असल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी कोल्हापूर पोलीस अधीक्षक कार्यालयात पत्रकार परिषदेत दिली आहे यावेळी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी धीरजकुमार पोलीस उपाधीक्षक तानाजी सावंत, प्रिया पाटील उपस्थित होत्या.