शहरातील पंचशील नगर जवळील राजमहल बार परीसरात हातात तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या एका युवकास भद्रावती पोलीसांनी अटक केली आहे. सदर कारवाई भद्रावती पोलिसांकडून दिनांक २१ रोज गुरुवारला दुपारी ३ वाजताच्या सुमारास पंचशील नगर परीसरात करण्यात आली.अमीत ओमप्रकाश टेंभुर्णे,वय २५ वर्ष, राहणार राहुल नगर असे या आरोपीचे नाव आहे.