देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट एक व खंडणी विरोधी पथकाने मानूर गाव येथे ताब्यात घेतले आहे.गुन्हे शाखा युनिट एककडील पोलीस अमलदार नितीन जगताप व खंडणी विरोधी पथकाचे पोलीस हवालदार दत्तात्रय चकोर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सराईत आरोपी योगेश बाळकृष्ण चव्हाण राहणार हिरावाडी,पंचवटी देशी बनावटीचे पिस्तोल विनापरवाना स्वतःजवळ बाळगून मानूर गाव येथील नीलकंठेश्वर महादेव मंदिर येथे ताब्यात घेतले आहे.