मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केले होते. त्यांच्या मागण्यांना अखेर यश मिळाल्या नंतर आज दिनांक 2 सप्टेंबर रोजी 8 च्या दरम्यान राज कॉर्नर इथे नांदेड जिल्ह्यात ठिकठिकाणी मराठा बांधवांच्या वतीने जल्लोष करण्यात आला. काँग्रेसचे माजी उपमहापौर सतीश देशमुख यांच्या वतिने राज कॉर्नर, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे फटाके फोडून आणि गुलालाची उधळण करून तसेच ढोल ताश्या गजरात जल्लोष करण्यात आला. मराठ्यांचा विजय झाल्याचे सतीश देशमुख म्हणालेत