कचरा टाकण्याच्या कारणावरून आरोपींनी पती-पत्नीला मारहाण केल्याची घटना शहरातील प्रभाग क्रमांक दोन येथे दिनांक 11 ऑगस्ट रोजी घडली.याप्रकरणी फिर्यादी चंदा खडतकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून कळंब पोलिसांनी आरोपी रामदास राऊत व विठ्ठल राऊत यांचे विरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास कळंब पोलीस करीत आहे.