बागलाणच्या तळवाडे भामेर येथील अन्नत्याग आंदोलनातील चार आंदोलकांचा वाढला रक्तदाब, एक आंदोलक रुग्णालयात दाखल.. Anc: हरणबारी तळवाडे भामेर या २७ किलोमीटरच्या एक्सप्रेस कालव्याचे काम रखडल्याने शेती सिंचन तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. यासाठी तेथील ग्रामस्थांनी 21 ऑगस्टपासून उपोषण सुरू केले आहे. या प्रकरणी प्रशासनाने मात्र पाठ फिरविल्याने आंदोलक आक्रमक झाले आहे. या आंदोलकांपैकी आज दिनांक 23 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास चार आंदोलकांचा रक्तदाब वाढला.