आज बुधवार 10 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की, समृद्धी महामार्गावर पुलाच्या दुरुस्ती संदर्भात खिळे लावून केमिकल सोडण्याचे काम सुरू असताना, अज्ञात वाहनाने ब्रॅकेट तोडल्यामुळे काही वाहने या ठिकाणी पंचर झाली होती, सदरील व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता याप्रकरणी पोलीस प्रशासनाच्या वतीने माहिती देण्यात आली की हा आरोपीचा प्रकार नसून पुलाच्या दुरुस्तीचा प्रकार होता अशी माहिती आज रोजी पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.