वाघोली येथील पुणे महानगरपालिकेच्या शाळेच्या प्रांगणामध्ये डुकरांचा व भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे शाळेला सुरक्षा भिंत नसल्याने डुकरांचा व कुत्र्यांचा वावर या ठिकाणी आढळून येत आहे. यावेळी या जनावरांकडून विद्यार्थ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न देखील झाल्या असल्याची माहिती समोर आली आहे. या ठिकाणी महानगरपालिकेने तात्काळ उपायोजना कराव्यात अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहर सरचिटणीस प्रकाश जमदाडे यांनी केली आहे. अन्यथा आंदोलन करू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.