अमरावती जिल्ह्यातील गावांच्या विकासाला चालना देण्यासाठी केंद्र शासनाची पी. एम. सूर्यघर मुफ्त बिजली योजनेअंतर्गत 'मॉडेल सोलर व्हिलेज' या योजनेसाठी पाच हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांकडून करून प्रस्ताव मागविण्यात येत आहे. पात्र असलेल्या गावांकडून 16 जूनपर्यंत प्रस्ताव मागवण्यात येत आहेत. स्पर्धेतील विजेत्या गावाला 1 कोटी रुपयांचा विशेष विकास निधी मिळणार असून, यातून गावात विविध सौर ऊर्जा आणि समुदाय-आधारित प्रकल्प राबवता येतील. या निधीमुळे गावांना विविध कामे हाती घेता येणार आहे