रावेर तालुक्यात वाघोदा बुद्रुक हे गाव आहे. या गावाजवळ प्रगती तोल काट्यासमोरून अंकलेश्वर बऱ्हाणपूर मार्गावरून दुचाकी क्रमांक एम.एच.१९ बी.एक्स.४५३६ द्वारे आकाश कोचुरे आणि त्यांची पत्नी प्रियंका कोचुरे हे जात होते. त्यांना अध्यात वाहनाने धडक दिली या अपघातात ते दोघे जखमी झाले. तेव्हा या प्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.