गणेश चतुर्थी अवघ्या दोन दिवसांवर आल्याने संपूर्ण जळगाव शहर गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. यामुळे सोमवारी २५ ऑगस्ट रोजी दुपारी १२ जळगाव शहरातील प्रभात चौक, फुले मार्केट आणि अजिंठा चौकात याठिकाणी खरेदीसाठी प्रचंड गर्दी उसळली आहे. मूर्ती खरेदीपासून ते सजावटीच्या सामानापर्यंत, प्रत्येक ठिकाणी गणेशभक्तांचा उत्साह दिसून येत आहे.