जायकवाडी प्रकल्प, नाथसागर जलाशय, पैठण यांनी दिलेल्या माहितीनुसार ठीक 22:00 ते 22:30 या दरम्यान गेट क्र. 10 ते 27 असे एकुण 18 गेटस 1 फुट उंचीवरुन 1.5 फुट उंचीपर्यंत उघडून 9432 क्युसेक विसर्ग वाढ करण्यात येईल.अशाप्रकारे गोदावरी नदीपात्रात सांडव्याद्वारे एकुण 18 गेटमधुन 18864 + 9432 असा एकूण 28296 क्युसेक विसर्ग सुरू राहील. आवक बघून विसर्ग कमी अथवा जास्त करण्यात येईल. असे देखील सांगण्यात आले आहे.