एरंडोल तालुक्यातील वरखेडी शिवारातील शेतातील कुंपनाच्या तारामधील विजेच्या धक्क्याने कुटुंबातील ५ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी २० ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गुरूवारी २१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याबाबत एरंडोल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.