लातूर -महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या लातूर विभागात सन 2025-26 या सत्रासाठी शिकाऊ उमेदवार (प्रशिक्षणार्थी) म्हणून 37 जागांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामध्ये यांत्रिक मोटारगाडी (21 जागा), मोटारगाडी साठा जोडारी (7 जागा), ऑटो इलेक्ट्रीकल तथा इलेक्ट्रिशियन (3 जागा), सांधाता-वेल्डर (1 जागा), रंगकामगार (16 जागा) आणि मेकॅनिक रेफ्रिजरेशन व एअर कंडिशनर (2 जागा) या व्यावसायिक पदांचा समावेश आहे.