एका युवकास एका इसमाने मारहाण करून जखमी केल्याची घटना शेगाव तालुक्यातील कालखेड येथे ३० ऑगस्ट रोजी रात्री ९.३० वाजे दरम्यान उघडकीस आली आहे.याबाबत कालखेड येथील इश्वर सुनिल दाभाडे वय २८ वर्ष या युवकाने शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दिली की, चौकात उभा असतांना तेथे सुनिल सरदार हा आला व म्हणाला की, तु येथे उभा राहु नको मी त्यास असे म्हटले की, मी इथेच उभा राहणार तुला काय करायच करून घे यानंतर तो घराजवळ आला व त्याने वाद करून लाकडी दांड्याने डोक्यावर मारहाण करून जखमी केले.