मुलुंड-ऐरोली जंक्शनवरील दररोजच्या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना होणारा मनस्ताप लक्षात घेऊन चारही दिशांना फ्री लेफ्ट टर्नचा प्रस्ताव देण्यात आला होता. या संदर्भात महानगरपालिका रोड विभाग, ब्रिज विभाग आणि वार्ड मधील संबंधित अधिकाऱ्यांसोबत आज बुधवार दिनांक २७ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता आमदार मिहीर कोटेचा यांची सविस्तर आढावा बैठक पार पडली.