सेनगांव तालुक्यातील जयपूर येथील घरकुल लाभार्थ्यांच्या विविध मागण्यासाठी सेनगांव पंचायत समिती कार्यालयासमोर आज ढोल बजाव आंदोलन पुकारून निषेध नोंदविण्यात आला आहे. जयपूर येथील घरकुल लाभार्थ्यांना तात्काळ घरकुलाचे हप्ते टाकावे यासह घरकुल विभागात कोणी भ्रष्टाचार करत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली असून यावेळी नागरिक मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.