जालन्यात काद्राबाद भागात 12 फुटी मातीच्या गणपतीची भव्य स्थापना. छत्तीसगड रायपूरहून आणलेली मूर्ती – विघ्नहर्ता गणेश मंडळाचा उपक्रम भाविकांचे आकर्षण. आज दिनांक एक सोमवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात उत्साह आणि भक्तीचा माहोल आहे. याच अनुषंगाने काद्राबाद भागात 12 फुटी भव्य मातीच्या गणपतीची स्थापना करण्यात आली असून, ही मूर्ती भाविकांचे विशेष आकर्षण ठरत आहे. या गणपती मूर्तीची खासियत म्हणजे ती पूर्णपणे काळ्या मातीपासून तयार केलेली इको-फ्रेंडल