राधानगरी तालुक्यातील पनोरी येथे श्रीमंती हरी रेडेकर (वय ७३) या वृद्ध महिलेचा मृतदेह गावातील विजय शंकर बरगे यांच्या घरातील गोबरगॅस प्लांटमध्ये संशयास्पद अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे.याप्रकरणी रेडेकर यांचा मुलगा अमित हरी रेडेकर यांनी सोमवार दिनांक 8 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजता राधानगरी पोलीस ठाण्यात अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आज मंगळवार दिनांक 9 सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता राधानगरी पोलीस ठाण्यातील मिळाली.