सिंदखेडराजा तालुक्यातील धांदरवाडी येथे २२ ऑगस्ट रोजी पोळा सणानिमित्त बैल धुण्यासाठी तलावात गेलेल्या पिराजी नामदेव पाटोळे यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. दोन दिवसांच्या शोधानंतर २४ ऑगस्ट रोजी त्यांचा मृतदेह तलावाच्या पाण्यावर तरंगताना आढळला.याप्रकरणी सिंदखेडराजा पोलिस स्टेशनला मृत्यूची नोंद केल्याची माहिती २५ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.