लातूर -मराठा आरक्षणासाठी लढलेले मनोज जरांगे यांची मागणी सरकारने मान्य केली असून हैदराबाद गॅझेट मराठवाड्यातील मराठा समाजासाठी लागू करण्याचा निर्णय जाहीर झाला आहे. या गॅझेटवर आधारित कुणबी प्रमाणपत्र देण्याचा अध्यादेश सरकारने काढणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.या निर्णयानंतर लातूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजबांधवानी गुलाल उधळला, एकमेकांना पेढे भरवले आणि फटाक्यांची आतिषबाजी करत निर्णयाचे जल्लोषात स्वागत केले.