जिल्हा क्रीडा संकुल येथे, चंद्रपूर जिल्हा बॅडमिंटन डेव्हलपमेंट असोसिएशन तर्फे डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार मेमोरियल महाराष्ट्र मिनी स्टेट सिलेक्शन बॅडमिंटन स्पर्धा-2025 चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन आज दि 10 सप्टेंबर ला 11 वाजता आ. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव सिद्धार्थ पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड,चंद्रपूर जिल्हा बॅडमिंटन डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश चांडक, अनिरुद्ध जोशी आदी उपस्थित होते.