तालुक्यातील चौसाळा-बीड रोडवरील दोन बिअर बार फोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ५२,९४० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी रमेश अकुंश कळसे (रा. चौसाळा, ता. बीड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते आयन नावाचा बार स्वतः चालवतात. मॅनेजर अजय मोरे यांनी बार बंद केला होता. दुसऱ्या दिवशी गणपती स्थापनेसाठी बार बंद होता. ते बोर चालू करण्यासाठी बारवर गेले असता घटना त्यांच्या निदर्शनास आली.