भंडारा जिल्ह्यातील मानेगाव येथील संदीप पेट्रोल पंप येथे दिनांक 10 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता दरम्यान तुळसीदास काशिनाथ गायधने वय 68 वर्षे रा. सेलोटि रोड लाखनी यांच्या छातीत दुखण्याच्या त्रासामुळे मृत्यू झाला. याप्रकरणी फिर्यादी प्रदीप तुलसीदास गायधने वय 32 वर्षे रा. सेलोटी रोड लाखनी यांच्या तोंडी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन लाखनी येथे मर्ग दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बागडे हे करीत आहेत.