बार्शीटाकडीच्या टिटवा गावात मंगळवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास नवनाथ बबन राऊत (24) याने दारूच्या नशेत वडील बबन रामराव राऊत (55) यांचा काठी व दोराच्या सहाय्याने डोक्यावर वार करून खून केला. घटनेची माहिती पोलीस पाटील पवन जाधव यांनी पिंजर पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. तपासाअंती आरोपी नवनाथ राऊतला वाशिम जिल्ह्यातील सेलू बाजार जवळ चिखली येथे अटक करण्यात आली. ही कारवाई ठाणेदार गंगाधर दराडे करीत आहेत.