शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी राबविल्या जाणाऱ्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरित करण्यात आला. राज्यातील ९१ लाख ६५ हजार १५६ शेतकऱ्यांच्या खात्यात १८९२.६१ कोटी रुपये जमा होणार असून, अकोला जिल्ह्यातील सुमारे १.७५ लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेसोबत राज्य सरकारतर्फे मिळणाऱ्या मदतीमुळे शेतकऱ्यांना दरवर्षी १२ हजार रुपये अनुदान मिळते. अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीमुळे त्रस्त शेतकऱ्यांसाठी हा