किमान वेतन कामगार कायद्याची पायमल्ली करून हुकूमशाही पध्दतीने कामगारांची सर्रास पिळवणूक सुरू असल्याने वंचित बहुजन आघाडीचे पूर्व विदर्भ समन्वयक बाळू टेंभुर्णे यांच्या नेतृत्वात शेकडोच्या संख्येत असलेल्या कामगारांनी जिल्हा शल्य चिकीत्सकांच्या कार्यालयावर धडक देऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले.यावेळी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. माधूरी किलनाके यांच्याशी विविध समस्यावर चर्चा करतांना कंपनी व संबंधीत प्रशासनातील कर्मचारी कामगारांची कशी पिळवणूक व शोषण करीत आहेत त्याची सविस्तर माहिती देण्याात आली.