पोलिसांनी संशयावरून एका युवकाची झडती घेतली असता त्याचेजवळून तलवार जप्त केल्याची कारवाई २७ ऑगस्ट रोजी रात्री ७.३० वाजे दरम्यान शिवनेरी चौकात येथे केली.श्री गणेश स्थापना मिरवणूकीच्या अनुषंगाने शिवनेरी चौकात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. पोलिसांना विठ्ठल सुरेश मानखैर (२४) रा. एसबीआय कॉलनी शेगाव हा युवक रस्त्याने त्याचे डावे हाताने पॅन्ट दाबत संशयीतरित्या चालताना दिसला. त्यावरून पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्या जवळून तलवार जप्त केली.