चोपडा शहरात रविवारी सकाळपासून गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. नगरपालिकेच्या वतीने यंदा पर्यावरण पूरक गणेश मूर्ती स्थापन करण्यात आली होती व त्यांच्या वतीने सकाळी शहरातून भव्य अशी विसर्जन मिरवणूक काढण्यात आली या विसर्जन मिरवणुकीमध्ये नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल पाटील हे स्वतः लेझीम खेळताना दिसून आले शहरात मेन रोडावर मिरवणुका आलेल्या आहेत.