मालेगावच्या द्याने येथे गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या Anc: मालेगाव येथील द्याने भागातील सुनील जिभाऊ देवरे (वय ३५) या तरुणाने सायने बुद्रुक शिवारात विजेच्या खांबाला गळफास घेतला. रुग्णवाहिकाचालक नाना पवार यांनी त्याला बेशुद्धावस्थेत येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले. डॉ. जिहाद यांनी तपासून त्याला मृत घोषित केले. 1 सप्टेंबरला सकाळी आठ वाजेच्या दरम्यान हा प्रकार घडला. तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.