बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील फुलसांगवी फाटा परिसरात ओबीसी महाएल्गार मेळाव्याच्या बॅनरवर अज्ञात समाजकंटकाने काळे फेकल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकारामुळे ओबीसी समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त होत असून समाजबांधवांनी याविरोधात जोरदार निषेध नोंदवला आहे. १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता शिंगारवाडी फाटा, तालुका गेवराई येथे ओबीसी समाजाच्यावतीने महाअेल्गार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या जाहीर सभेच्या प्रसिद्धीसाठी गेवराई तालुक्यातील विविध ठिकाणी बॅनर लावण्यात आले होत