करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसरातील वारसा संरक्षण, व्यवस्थापन आणि भक्तहिताच्या संदर्भातील समस्यांवर हिंदू एकता आंदोलन, कोल्हापूर यांच्यावतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासोबत आज बैठक पार पडली. संघटनेने या बैठकीत आपला अभ्यास व पाहणी अहवाल सादर करून अनेक गंभीर मुद्दे अधोरेखित केले.